गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना अच्छे दिन

जगभरात एआय टेक्नोलॉजीची क्रेझ वाढत आहे. जगातील टॉपचे टॅलेंट गुगलकडे राहावे यासाठी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला वार्षिक पगार म्हणून तब्बल 2.8 कोटी रुपयांची बेस सॅलरीची ऑफर देत आहे. ही आकडेवारी गुगलने अमेरिकी लेबर डिपार्टमेंटला पाठवलेल्या डेटातून समोर आली आहे. या सॅलरीत केवळ बेस पे दाखवण्यात आले आहे. यात बोनस आणि स्टॉक ऑप्शनचा समावेश नाही. गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्संना सर्वात जास्त पगार दिला जात आहे. गुगलने आता आपल्या कर्मचाऱ्यांच्या परफॉर्मन्स रिह्यू सिस्टममध्ये बदल केला आहे. आता कंपनी प्रत्येक कर्मचाऱ्यांना वार्षिक रेटिंग देऊन बोनस आणि इक्विटी ठरवली जात आहे.