गोरेगावमध्ये एका घराला भीषण आग, तिघांचा होरपळून मृत्यू

गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंग नगर परिसरातील एका घरात पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 2 पुरुष आणि 1 महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

आग लागली त्या वेळी तिघेही जण एकाच घरात झोपलेले होते. आगीदरम्यान निर्माण झालेल्या धुरामुळे तिघांचाही गुदमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

या घटनेचा तपास सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.