
पूर्ववैमनस्यातून तिघांनी मिळून धारदार शस्त्रांनी वार करत एका 17 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना गोवंडीतल्या शिवाजीनगर येथे घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. अहमद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी संध्याकाळी तिघांनी मिळून अहमद याला शिवाजीनगरातील प्लॉट 25 येथे गाठले. तिघांनी मिळून अहमदच्या मान, डोके व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. जखमी अहमदला त्याच्या भावाने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याला मृत घोषित केले.