
गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारने यंदाही टोलमाफी जाहीर केली. गावी जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासासाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचे आज राज्य शासनाकडून सांगण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीतील निर्णय
z दहा वर्षे जुन्या मंडळांना तातडीने परवानगी
z गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती या वर्षीही कायम राहील. त्यासाठी शुल्क आकारणी करू नये.
z मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी.
z लालबागमध्ये पालिकेने मोफत पार्पिंग व्यवस्था करावी.
z महापालिकेच्या मैदानात गणपती बसवणाऱ्या मंडळांना विशेष सवलती देणार.
z मंडळांच्या स्थानिक कार्यालयाची असेसमेंट फी कमर्शियल शुल्काऐवजी निवासी दरात घेतले जाणार.