स्मार्टफोनमधून होणारा फ्रॉड रोखता येणार, ‘संचार साथी’ अॅप प्री इन्स्टॉल करण्याचे फोन कंपन्यांना निर्देश

नव्या कोऱया स्मार्टफोनमध्ये स्मार्टफोन सुरक्षा अॅप ‘संचार साथी’ प्री इन्स्टॉल करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सर्व स्मार्टफोन कंपन्यांना दिले आहेत. तसेच हा अॅप प्री इन्स्टॉल असायला हवा तसेच या अॅपला अनइन्स्टॉल किंवा डिलीट करता येणार नाही, याची कंपन्यांनी काळजी घ्यायला हवी, असे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे स्मार्टफोनद्वारे केला जाणारा फ्रॉड रोखण्यात मदत मिळणार आहे.

सरकारने या कामासाठी स्मार्टफोन कंपन्यांना 90 दिवसांचा वेळ दिला आहे. कंपन्यांनी सुनिश्चित करायला हवे की, हे अॅप फोनमध्ये आधीच इन्स्टॉल असायला हवे. अॅपल, सॅमसंग, विवो, ओप्पो आणि शाओमी यांसारख्या कंपन्यांना या आदेशाचे पालन करायला लागणार आहे. काही कंपन्यांना हा आदेश खासगीत पाठवला आहे. याला सार्वजनिक करण्यात आले नाही. सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पाऊल सायबर सिक्योरिटीला आणखी मजबूत करण्यासाठी आवश्यक आहे. अॅपल कंपनीने आधीच सरकारी अॅपला प्री इन्स्टॉल करण्यास विरोध दर्शवला आहे. कंपनीच्या धोरणानुसार, आयफोनमध्ये केवळ त्यांच्या कंपनीच्या अॅप्सला डिव्हाइसमध्ये इन्स्टॉल केले जाऊ शकते.