
आयआयटी मद्रासमधून पदवी मिळवलेला आणि कॅलिफोर्नियात शिक्षण घेत असलेला हिंदुस्थानी विद्यार्थी साकेत श्रीनिवासैया अचानक बेपत्ता झाला आहे. कॅम्पसमध्ये त्याचा बॅकपॅक मिळाला असून गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता झाला आहे. साकेत हा कॅलिफोर्नियाच्या बर्कले विद्यापीठात पदव्युत्तरचे शिक्षण घेत होता. साकेत 9 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, साकेतला अखेरचे यूसी बर्पले कॅम्पसपासून जवळपास एक किलोमीटर दूर पाहिले गेले आहे. तेव्हापासून तो कोणालाच दिसला नाही.
























































