
कर्नाटकातील एका छोट्याशा दुकानात भाजी विक्रीचा धंदा करणाऱ्या एका भाजी विक्रेत्याला आयकर विभागाने तब्बल 29 लाख रुपयांची जीएसटी नोटीस पाठवली आहे. शंकर गौडा असे या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. गेल्या चार वर्षात 1.63 कोटींचा डिजिटल व्यवहार केला आहे, असे सांगून जीएसटी अधिकाऱ्यांनी त्यांना 29 लाख रुपये भरायला सांगितले आहे.