गुहागरात भगवे वातावरण; शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्यासह सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल

गुहागर तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात आले. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी गुहागरमध्ये भगवे वातावरण निर्माण झाले होते.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी असगोली जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज भरला आहे. पडवे जिल्हा परिषद गटातून तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटातून सिध्दी रामगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कोंडकारूळ जिल्हापरिषद गटातून मानसी घाणेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. शृंगारतळी जिल्हापरिषद गटातून मनसेचे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. गुहागर पंचायत समिती निवडणुकीत पाचेरी गणातून शशिकला मोरे, पडवे गणातून रवींद्र आंबेकर, वेळणेश्वर गणातून सचिन जाधव, शीर गणातून ज्योत्स्ना कातळकर, कोंडकारूळ गणातून महेश गोवळकर, मळण गणातून साक्षी चव्हाण, शृंगारतळी गणातून संजय पवार, तळवली गणातून संदीप धनावडे, असगोली गणातून उर्वी खैरे, अंजनवेल गणातून प्राजक्ता जांभारकर यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.