गुजरातमधील राजकोटमधील निवासी इमारतीला आग; 3 जणांचा मृत्यू

Gujarat Rajkot fire breaks out residential building 3 killed

गुजरातच्या राजकोट मधील रिंग रोडवरील अस्लांटिस इमारतीला भीषण आग लागली. 150 फूट उंच इमारतीला लागलेल्या आगीमुळे त्या भागात गोंधळ उडाला. परिसरात घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आग लागली आणि 30 हून अधिक लोक आत अडकले. दुर्दैवाने, या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

इमारतीमधील एका फ्लॅटमध्ये फर्निचरचे काम सुरू होते तेथे शॉर्ट सर्किटमुळे हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे काम सुरू असून बचावकार्यात आतापर्यंत 50 जणांना वाचवण्यात यश आले आहे.