Hit & Run – भरधाव टाटा सफारीची दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, 4 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

काळजाचा थरकाप उडवणारी हिट अँड रनची एक घटना समोर आली आहे. बेदरकारपणे गाडी चालवत दुचाकींसह पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10.15 च्या सुमारास घडली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गुजरातच्या गांधीनगरच्या रणदेसन परिसरात मद्यधुंद सफारी चालकाने पादचारी आणि दुचाकींना धडक दिली. यात एका महिलेसह चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले. भरधाव सफारी भाजीपुरा ते सिटी पल्स सिनेमाकडे चालली होती.

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहेत. सदर कार हितेश विनुभाई पटेल याच्या नावे असून कार चालक स्वतः गाडी चालवत होता. चालकाला अटक करण्यात आली आहे.