नामांकित आईस्क्रीममध्ये सापडलं पालीचं शेपूट

एका नामांकित कंपनीच्या आईस्क्रीम कोनमध्ये पालीचे शेपूट आढळल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडली. त्यानंतर या आईस्क्रीम ब्रँडचे पार्लर सील करण्यात आले. अहमदाबाद येथील मणिनगर भागात महालक्ष्मी कॉर्नर येथे हॅवमोरचे पार्लर आहे. पार्लरमधून एका महिलेने हॅपी कोन विकत घेतला. कोन खात असताना त्यामध्ये पालीच्या शेपटीचा भाग असल्याचे महिलेच्या लक्षात आले. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर हे दुकान तातडीने बंद करण्यात आले. अहमदाबाद महापालिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली, नरोदा भागात हॅवमोर आईस्क्रीमच्या फॅक्टरीचा साठा मागे घेऊन 50 हजारांचा दंडही लावण्यात आला.