वीज गेली म्हणून जनरेटर लावून झोपले, श्वास गुदरमल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

वीज गेली होती म्हणून जनरेटर लावून झोपले. पण याच जनरेटरमुळे एकाच कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे. जनरेटच्या धुरामुळे श्वास गुदरमरल्याने तिघांचा झोपेतच मृत्यू झाल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. गुजरातमधील सूरत जिल्ह्यात ही घटना घडली.

बाळूभाई पटेल (76), सीताबेन राठोड (56) आणि वेदाबेन राठोड (60) अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला.

मयत तिघेजण नेहमीप्रमाणे गुरूवारी रात्री झोपी गेले. वीज गेली असल्याने त्यांनी जनरेटर लावला होता. जनरेटर बराच वेळ लावला असल्याने त्यातून धूर निघू लागला, सकाळी शेजाऱ्यांनी घरातून धूर येत असल्याचे पाहिले. यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

पोलिसांनी जनरटेर बंद करत खोलीत प्रवेश केला असता आत तिघेही मृतावस्थेत आढळले. जनरेटमधून निघणाऱ्या धुरामुळे श्वास गुदरमल्याने तिघांचा मृत्यू झाला. तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.