
‘‘लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात, दुष्काळ नाही पडला तरी शिव्या देतात. शिव्या ऐकणे आम्हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावे,’’ असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.
अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी शेतकऱयांच्या भावना दुखावणारे विधान केले. महायुतीचे बरेच मंत्री आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाटील यांच्या या वादग्रस्त विधानाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले.