
सोन्यावर असलेले हॉलमार्किंग आता चांदीच्या दागिन्यांवरसुद्धा दिसणार आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लागू करण्याची तयारी केली जात आहे. हे हॉलमार्किंग स्वेच्छेने लागू केले जाईल. चांदीच्या दागिन्यांच्या 6 ग्रेडवर लागू होईल. चांदीवर 6 अंकी एचयूआयडी हॉलमार्किंग लागू होईल. सरकारने 1 एप्रिल 2024 पासून सोने आणि त्याच्या दागिन्यांवर हॉलमार्किंग अनिवार्य केले होते.