मानेवर नांगर घेऊन मंत्रालयावर निघालेल्या शेतकऱ्याची प्रकृती ढासळली

सातबारा कोरा करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केलेल्या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी मानेवर नांगर घेऊन लातूर ते मुंबई 500 किमीची पदयात्रा करणाऱ्या शेतकऱ्याची प्रकृती ढासळली आहे. मुंबईच्या वेशीवर पोहोचताच त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सहदेव होनाळे असे या बळीराजाचे नाव असून आम्हाला न्याय कधी मिळणार, असा आर्त सवाल त्यांनी सरकारला केला आहे.