दिवाळी नंतरचा डिटॉक्स

दिवाळी संपली. आता परत आपण आरोग्याची घडी सुरळीत करू. त्यासाठी काही टीप्स…

भरपूर पाणी प्या न चुकता…

  • दिवाळीच्या वेळी केलेला मेकअप, पर्यावर्णीय घटक जसे की फटाके, वातावरणातील बदल आणि थंडी यामुळे आपली
    त्वचा कोरडी पडू शकते. ते हायड्रेशन हे निरोगी त्वचेसाठी वरदान आहे आणि दिवाळी नंतरच्या काळात आवर्जून पाणी प्या. त्यामुळे बिघडलेले डाएट परत सुरू करता येऊ शकेल. खूप लोक ही गोष्ट विसरतात आणि म्हणूनच ही आठवण…
  • फिरायला गेलाय का ? मग शहाळे, लिंबूपाणी, ताक, सूप यावर जोर द्या. सब्जा, चिया सीड्स घेऊन जा. ते एक लिटर
    बाटलीत 2 चमचे भरून बाहेर पडा. अर्ध्या तासात ते भिजतील. ते पाणी प्या.

छोटा उपवास करा

  • उपवास म्हणजे अगदी दिवसभर जेवल्या शिवाय राहा असानाही. फक्त 14-15 तासांचे अंतर ठेवा. उदाहरणार्थ, रात्री 8 वाजता शेवटचे जेवण केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता जेवण. याचा अर्थ लवकर रात्रीचे जेवण आणि 12 वाजता जेवण आणि 16 तास आपल्या पाचक इंद्रियाना आराम!
  • हा एक सोपा उपाय. पण जमलं तर पूर्ण दिवस उपवास करा. न खाता जमलं नाही तर फळे, शहाळ्याचे पाणी असे घेऊन उपवास केला तरी चालेल.

बाहेरचे अन्न टाळावे

  • दिवाळीत अनेकदा बाहेरचे अन्न खाल्ले जाते. ते कधी ही योग्य नाही. खाद्यतेल, शर्करा, कृत्रिम फ्लेवर्सचा आणि रंग
    यांचा वापर आणि रेस्टॉरंटची गुणवत्ता आणि स्वच्छतेचा अभाव ही आरोग्याची अक्षरशः धुळधाण करत असते. दिवाळी नंतर बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळा. घरचे पौष्टिक, ताजे अन्न खा.

योग्य व्यायाम सुरू करा

  • सध्या मस्त थंडी पडू लागलेय. चला, पळा किंवा जिमला जा आणि भरपूर व्यायाम करा किंवा घरी व्यायाम करा.
  • व्यायाम केल्या वर भरपूर घाम येऊदे. त्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील आणि अतिरिक्त वजन कमी
    होण्यास मदत होईल.
  • दिवाळीचे पदार्थ खाऊन अतिरिक्त कॅलरीज वाढल्या असतील तर तुम्ही जर व्यायामात खंड पडला असेल तर त्याला
    लवकरा त लवकर सुरुवात करा. यानिमित्ताने आरोग्य राखण्याची रुजवात करा .

अर्चना रायरीकर,
आहार तज्ञ