धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, गावचा संपर्क तुटला; गावकऱ्यांचा नदीकाठी मुक्काम

धाराशिव जिल्यातील वाशी कळंब परिसरात शनिवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. त्यात त्यातच संगमेश्वर प्रकल्पतील विसर्ग वाढल्याने मांजरा नदीला महापुर आला. बीड धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फकृबादच्या मांजरा नदीवरील अरुंद पुल पुरामुळे रस्त्यासह वाहुन गेला आहे. पुरामुळे गावाशी संपर्क तुटल्याने गावकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. गावकऱ्यांनी नदीकाठीच आसरा घेउन मुक्काम ठोकावा लागला. गावचा संपर्क तुटण्याची आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे .शेती शिवारात पुराचे पाणी घुसल्याने सोयाबीनची पिके पाण्यात गेली आहेत. धाराशिव बीड लातुर जिल्ह्याची तहान भावगणारा मांजरा प्रकल्प उगम भागातील जोरदार पावसामुळे मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे भरण्याच्या प्रतिक्षेत आहे .

धाराशिव आणि बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या फकृाबाद ( ता वाशी)गावची लोकसंख्या दोन हजाराच्या आसपास आहे. मांजरा नदी पात्राजवळच हे गाव वसल्याने या गावाला जाण्यासाठी एकच रस्ता आहे. मांजरा नदीला पुर आला की पावसाळ्यात या गावचा संपर्कच तुटतो. मांजरा नदीवरील अरुंद पुलाचा फटका या गावकऱ्यांना बसतो व गावचा संपर्कच तुटतो. यामुळे आजारी रुग्णांना उपचारासाठी घेउन जाणे दुरापस्त होतं. शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे मांजरा नदीला महापुर आला असुन याचा फटका फकृबादला बसला आहे. नदीवरील पुलावरून पाणी शेती शिवारात घुसले व चक्क पुलासह रस्ताच वाहुन गेल्याने याचा मोठा फटका गावकऱ्यांना बसला आहे या गावचा संपर्कच तुटला आहे.

आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था करतेय काय!

पावसाळ्यात आपत्ती व्यवस्थापन पाहणी करते. गेल्या अनेक वर्षापासुन गावकरी पुलाची उंची वाढवावी अशी मागणी करत असल्याचे अ‍ॅड दत्तात्रय मुरकुटे यांनी सांगितले. परंतु प्रशासन याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे गावकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. पूर आल्यानंतर गावच्या बाहेरचे लोक नदिकाठी अडकतात, मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतात. त्यामुळे आता तरी प्रशासनाने या कडे लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणी होत आहे.