मराठवाड्यावर आभाळ फाटले; अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार

शनिवारी रात्री मराठवाड्यावर पुन्हा आभाळ फाटले. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिह्यांत पावसाने थैमान घातले आहे. बीडमधील सर्वच नद्यांना महापूर आल्याने 32 गावांना पुराने वेढले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात 10 मंडळांत अतिवृष्टी झाल्याने महाप्रलय झाला.

रात्री तब्बल 200 मिमी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे नाथसागरचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले असून सवा लाख क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या तालुक्यात सर्वत्र पूर आला असून त्यात लहानमोठी 60 जनावरे वाहून गेली. अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात शनिवारी रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी महापूर आल्याने हाहाकार माजला. बीडमधील 32 गावांसह मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला. पैठणमध्ये नाथसागरमध्ये मध्यरात्रीपासून पाण्याची आकक प्रचंड प्रमाणात काढल्यामुळे जायकवाडी धरणाचे 9 आपत्कालीन दरकाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने भल्या पहाटे घेतला. त्यामुळे प्रकल्पाचे सर्क 27 दरकाजे साडेचार फूट कर करण्यात आले आणि सवा लाख क्युसेकचा जलकिसर्ग करण्यात आला.

पैठण तालुक्यातील पाऊस

कचनेर (105.5 मिमी), पिंपळकाडी (115.3 मिमी), बालानगर (105.5मिमी), नांदर (208.8 मिमी), लोहगाव (158.0 मिमी), ढोरकीन (104.5 मिमी), बिडकीन (87.5 मिमी), पैठण (190.8 मिमी), पाचोड (107.5 मिमी) आणि किहामांडका (199.3 मिमी).