
चारधाम यात्रेला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार असून केदारनाथ धामचे दरवाजे 22 एप्रिलला उघडणार आहेत. केदारनाथ यात्रेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. केदारनाथ परिसरात मोठी बर्फवृष्टी झाल्याने या ठिकाणी पाच फुटांपर्यंत बर्फ साचला आहे. सगळीकडे नुसते बर्फाचे ढीग साचले आहेत. लागोपाठ बर्फवृष्टी होत असल्याने यात्रेच्या तयारीमध्ये अडथळे येत आहेत. साचलेला बर्फ हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भाविकांना अडचण येऊ नये, यासाठी चारधाम यात्रेआधीच सर्व बर्फ हटवला जाणार आहे. सध्या बर्फवृष्टीमुळे केदारनाथ अक्षरशः गोठले आहे.

























































