
भगवान महावीरांची मूर्ती चोरी प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच त्याच्या शिक्षेला अंतरिम स्थगिती दिली.
रमेश पाटील असे या आरोपीचे नाव आहे. एमएचबी पोलीस ठाण्यात मूर्तीचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला. पाटीलसह सात जणांविरोधात खटला चालला. सत्र न्यायालयाने पाटीलसह तिघांना जन्मठेप ठोठावली. या शिक्षेला पाटीलने आव्हान दिले. अपील याचिका प्रलंबित असेपर्यंत शिक्षेला स्थगिती द्यावी व जामीन मंजूर करावा, अशी विनंती केली. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ती मान्य केली.