
दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरापासून मतदान केंद्रांपर्यंत नेण्यासाठी आणि घरी परत सोडण्यासाठी वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महानगरपालिका आयुक्तांना केली.
नागपुरातील रहिवाशी प्रकाश अंधारे यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. नागपूर महापालिकेला 150 ई-बसेस मंजूर झाल्या असून त्यापैकी 30 बसेस मिळाल्या आहेत. त्यात हायड्रॉलिक लिफ्टची सुविधा आहे. निवडणुकीपर्यंत ही बस सेवा सुरू झाल्यास दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जाता येईल, असे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. मात्र निवडणुकीपर्यंत ही बस सेवा सुरू होऊ शकत नाही, असे महापालिकेने न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने महापालिका आयुक्तांना विचारणा करून लगेच उत्तर देण्यास सांगितले.
























































