
नागरिकांना मिरवणूक काढण्याचा हक्कच आहे. हा हक्क कोणी नाकारू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सोमवारी बारामती पोलिसांना झटका दिला. पोलिसांनी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षाला मिरवणूक काढण्यास परवानगी नाकारली होती. यावरून न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली आणि याचिकाकर्त्यांना परवानगीसाठी पुन्हा अर्ज करण्यास मुभा दिली.
‘एआयएमआयएम’ने संविधान दिन, हजरत टिपू सुलतान स्मृती दिन आणि भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मृती दिनानिमित्त मिरवणूक काढण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली. त्याविरोधात पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज इलाही शेख यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठाने निर्णय दिला.