
ईव्हीएममध्ये घोटाळा, मतदारांना पैशाचे वाटप तसेच मतदार याद्यांमध्ये घोळ घालत भाजप, मिंधे गटाने विधानसभा निवडणूक जिंकली असून भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. या निवडणूक याचिकेवर उद्या सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करण्यात आला. भाजपच्या गणेश नाईक यांनीही निवडणूक गैरमार्गाने जिंकली असून शिवसेनेच्या मनोहर मढवी यांनी त्यांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले आहे. निवडून आलेल्या उमेदवारांची निवड अवैध ठरवण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्यासमोर उद्या, सोमवारी सुनावणी होणार आहे.





























































