
हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंग करताना झालेल्या अपघातात गुजरातमधील पर्यटकाचा मृत्यू झाला. कांगडा जिल्ह्यातील धर्मशाळा शहराजवळ ही घटना घडली. सतिश (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सतिश पर्यटनासाठी कुटुंबासोबत धर्मशाळा येथे पर्यटनासाठी आला होता. रविवारी शहराच्या उपनगरातील इंद्रु नाग पॅराग्लायडिंग साइटवरून पॅराग्लायडर पायलट सूरजसोबत सतिशने पॅराग्लायडिंगसाठी उड्डाण घेतले. मात्र थोड्या अंतरावर त्यांचा पॅराग्लायडर कोसळळा. यात सतिश गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ उपचारासाठी धर्मशाळा झोनल रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी तांडा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.