हे करून पहा- रंग खेळायला जाण्यापूर्वी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

रंगपंचमीला रंग खेळून झाल्यानंतर त्वचेवरील रंग चटकन निघत नाही.  त्यामुळे रंग खेळायला जाण्यापूर्वी आणि रंग खेळतानाही त्वचेची काळजी घेतली पाहिजे. सर्वात आधी चेहऱयाला भरपूर मॉईश्चरायझर आणि अंगाला बॉडी लोशन लावून घ्या.

त्यानंतर त्वचेवर  खोबरेल तेल वापरू शकता. मॉईश्चरायझर आणि बॉडी लोशन लावल्यानंतर सगळय़ा त्वचेला व्यवस्थित तेल लावून घ्या. तेलामुळे तुमच्या त्वचेला जास्त संरक्षण मिळेल.  रंग खेळायला जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका.