हे करून पहा – डाळी किंवा पिठात अळ्या झाल्या…

बऱ्याचदा थंडी किंवा पावसाळ्यात सूर्यप्रकाश नसल्याने डब्यात ठेवलेल्या डाळी किंवा तांदूळ किंवा पिठात अळ्या होतात. अशा वेळी घरगुती उपाय करून धान्य, पीठ सुरक्षितपणे ठेवता येते. कडुलिंबाच्या पानांचा वापर करून किडे घालवू शकतो.

मसाल्यांमधील तमालपत्रे, लसूण, काळीमिरी या गोष्टींदेखील धान्याच्या किंवा पिठाच्या डब्यात ठेवू शकतो. त्याच्या वासामुळे किडे, अळ्या होत नाहीत. धान्याला कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी माचिस (मॅच बॉक्स) उपयुक्त ठरते. त्यात असलेल्या सल्फरमुळे कीटक पळून जातात.