
हाँगकाँगच्या एका ब्लॉगरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संबंधित ब्लॉगर आपल्या मित्रांसह मुंबईतील एका स्टॉलवर वडापावचा आस्वाद घेताना दिसत आहे. यावेळी ब्लॉगर तरुणीने ‘भाऊ, मला वडापाव द्या ना’ असे चक्क मराठीतून म्हटले. परंतु तिच्या या उच्चाराने तिच्या सहकाऱ्यांना हसू अनावर झाले. तिने मराठीत संवाद साधल्याने तिच्याकडे सर्वांनीच कुहलाने पाहिले. मराठी संवादासाठी तिने गुगलचा आधार घेतल्याचे म्हटले.