असं झालं तर… स्मार्टफोन हॅक होण्यापासून रोखायचा असेल तर…

व्हायरस, फिशिंग अटॅक स्मार्टफोनमधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमच्या स्मार्टफोनचा ताबा घेऊ शकतात. हे टाळायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

हॅकर्स काही लिंकचा वापर करतात. त्या वेगवेगळ्या माध्यमातून पाठवण्यात येतात. अशा अनोळखी लिंकवर तुम्ही क्लिक करणे टाळायला हवे.

अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवर आरटीओ चालान किंवा इतर अ‍ॅप काही ग्रुप्सवर पडतात. कोणतीही पडताळणी केल्याशिवाय हे अ‍ॅप्स तुम्ही इन्स्टॉल करू नका.

फोनचे सॉफ्टवेअर आणि सुरक्षा पॅच हे नेहमी अपडेट करायला हवे. यामुळे स्मार्टफोनला सुरक्षेचे अतिरिक्त कवच मिळते.

एक चांगले अँटीव्हायरस स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करा. त्यामुळे धोकादायक लिंक किंवा अ‍ॅपबाबत आधीच अलर्ट मिळतो आणि असे अ‍ॅप इन्स्टॉल होत नाहीत.