
सध्या सोशल मीडियावर फुलबाजा बनवणाऱ्या फॅक्टरीतील एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. फुलबाजा बनवण्याची पारंपरिक आणि अत्यंत धोकादायक पद्धत पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. इन्स्टाग्रामवर ‘thefoodiehat’ नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओs शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये कामगार कशा पद्धतीने फुलबाजे तयार करतात, हे दाखवले आहे. फुलबाजे बनवण्यासाठी धोकादायक रासायनिक मिश्रण तयार केले जाते. त्यानंतर पातळ तारांना एका साच्यात ठेवून त्यांना या जाडसर रासायनिक मिश्रणात बुडवले जाते. त्यानंतर या तारा उन्हामध्ये वाळवल्या जातात. शेवटी, तयार फुलबाजा आकर्षक डब्यांमध्ये पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवल्या जातात. ही प्रक्रिया जितकी सोपी दिसते, तितकीच ती जीवघेणी आहे. या नेटकरी भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.