असं झालं तर… बँकेतून कार लोन घ्यायचंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मनपसंत कार खरेदी करावी असे अनेकांचे स्वप्न असते. कार लोनमुळे हे स्वप्न सोपे झाले आहे. पण काहीवेळेला बँक कर्जाची फाईल नाकारते.

कार लोनसाठी अर्ज करण्यापूर्वी 3-6 महिने आधी तुमचा सिबील स्कोर तपासून घ्या. सिबील स्कोर चांगला नसेल तर तो सुधारण्यासाठी प्रयत्न करा.

अनेक बँका या 100 टक्के ऑन-रोड फंडिंग देण्याचा दावा करतात. मात्र तुम्ही 15 ते 20 टक्के डाउन पेमेंट स्वतः करण्याचा प्लॅन करा. जोखीम कमी होते.

कार लोन घेताना फक्त व्याजदर पाहू नका. फाइल चार्ज, प्रोसेसिंग फीस आणि प्री-पेमेंट पेनल्टीविषयी अवश्य विचारा. प्रोसेसिंग फीमध्ये सवलत मिळेत का विचारा.

बँका तुमच्या एकूण मासिक उत्पन्नापैकी किती रक्कम विद्यमान ईएमआयमध्ये जाते हे पाहतात.  आधीची लहान कर्ज  असतील तर ती कार लोन घेण्यापूर्वी बंद करा.