विनापाण्याने बटाटे शिजवा… हे करून पहा

हिंदुस्थानात घरोघरी स्वयंपाकघरात एक भाजी हमखास असते, ती म्हणजे बटाटा. बहुतांश खाद्यपदार्थांमध्ये उकडलेला बटाटा वापरण्यात येतो. मात्र पाण्याशिवायदेखील बटाटा उकडता येतो.

n जाड बेस असलेली कढई किंवा पातेले घ्या. या भांडय़ाच्या तळाशी साधारणतः 2 चमचे मीठ पसरवा. त्यावर स्वच्छ धुतलेले बटाटे ठेवा. त्यानंतर भांडय़ावर घट्ट बसेल तसे झाकण ठेवा.

n गॅसच्या अतिशय मंद आचेवर भांडे ठेवा. दर 7-8 मिनिटांनी बटाटे उलटवून घ्या. साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये बटाटे शिजतात. सुरी टोचून बटाटे मऊ झाले का ते पाहा. बटाटय़ाचा नैसर्गिक ओलावा आणि मीठ यामुळे बटाटे पाण्याविना शिजतात.