भेसळयुक्त मिठाई कशी ओळखाल, हे करून पहा

दिवाळीत सगळ्यात जास्त खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे मिठाई. याचाच गैरफायदा काही लोक घेतात. बाजारात सर्रासपणे भेसळयुक्त मिठाई विक्रीला आणली जाते. ही मिठाई खाल्ल्यानंतर आजारी पडण्याची दाट शक्यता असते. जर मिठाईचा रंग खूप जास्त गडद किंवा पृत्रिम दिसत असेल, तर ती भेसळयुक्त असण्याची शक्यता आहे.

nजास्त चमकणारी मिठाई टाळा. कारण त्यात भेसळ असू शकते. शक्यतो चांगल्या आणि नामांकित दुकानांमधूनच मिठाई खरेदी करा. मिठाई बनवणाऱ्या ठिकाणाची आणि दुकानाची स्वच्छता तपासणेही गरजेचे आहे. जी मिठाई स्वस्तात किंवा उघडय़ावर मिळत असेल तर ती खरेदी करणे टाळणे योग्य आहे.