
n कोणत्याही हॉटेलमध्ये मिळणारा भात हा अत्यंत मोकळा आणि पांढराशुभ्र असतो, परंतु घरात बनवलेला भात मोकळा होत नाही. यासाठी काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी तांदूळ किमान चार ते पाच पाण्याने चांगले धुवा. भात शिजवण्यासाठी तांदळाच्या दुप्पट पाणी घ्या. एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी घ्या.
n कुकरमध्ये भात शिजवायचा असेल तर तांदळाच्या दीड पट पाणी घ्या. भात बनवण्यासाठी पाणी, तांदूळसोबत लिंबाचा रस आणि एक चिमूटभर मीठ घालायला विसरू नका. एक चमचा तूप किंवा लोणी त्यात टाका. कुकरमध्ये भात शिजवत असाल तर एका शिटीनंतर गॅस मंद करा. भात एकदम हॉटेलसारखा मोकळा होतो.