
सध्याच्या काळात आपण भाजीवाल्यापासून अगदी मोठय़ा शोरूमपर्यंत सगळीकडे यूपीआयने पेमेंट करतो. इंटरनेट किंवा वाय-फाय नसतानाही आपल्याला पैसे पाठवता येतात.
ग्रामीण भागात इंटरनेट नसताना यूपीआयने पेमेंट करताना अडचणी येतात. यावर पर्याय म्हणून नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशनने ही सुविधा सुरू केली आहे.
विना इंटरनेट पैसे पाठवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी मोबाईलच्या डायलपॅडवरून *99# हा कोड डायल करा. थोडय़ाच वेळात तुमच्या स्क्रीनवर एक मेनू दिसेल.
पैसे पाठवण्यासाठी “Send Money” पर्याय निवडा. त्यानंतर समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर किंवा यूपीआय आयडी टाकण्यास सांगितले जाईल. त्याप्रमाणे कार्यवाही करा.
या सुविधेचा वापर घेण्यापूर्वी तुमचा मोबाईल नंबर बँकेशी लिंक असणे अनिवार्य आहे. काही बँकांमध्ये यासाठी आधार कार्ड लिंक असणेही गरजेचे असू शकते.























































