गॅस शेगडीचा बर्नर काळाकुट्ट झाला, हे करून पहा

स्वयंपाकघरात गॅस बर्नरवर तेलाचे डाग, अन्नपदार्थ आणि धुराची काजळी बसते. अशावेळी घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून बर्नर चकचकीत करता येतो. गरम पाण्यात 2 लिंबांचा रस आणि लिंबाची टरफले टाका. यात बर्नर 2 तास भिजवून ठेवा. त्यानंतर डिशवॉश जेलने थोडे घासा.

बर्नरवरील काजळी काढण्यासाठीइनोअत्यंत उपयुक्त ठरतो. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा हा उपाय सर्वात परिणामकारक आणि फायदेशीर मानला जातो. एका भांडय़ात इतके पाणी घ्या की, त्यात बर्नर पूर्णपणे बुडतील. त्यात बेकिंग सोडा आणि अर्धी वाटी व्हिनेगर घाला. रात्रभर किंवा किमान 4 तास बर्नर त्यात भिजत ठेवा.