
- कनेक्शनधारकाच्या मृत्यूनंतर गॅस कनेक्शन दुसऱयाच्या नावावर ट्रान्सफर होते. पण त्यासाठी काही कागदपत्रे सादर करून एपंदरीत प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
2.जवळच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधा. तिथे तुम्हाला एक फॉर्म भरून द्या. त्यामध्ये नवीन कनेक्शनधारकाची सर्व माहिती भरावी. छायाचित्र चिकटवावे.
3.अर्जासोबत ज्यांच्या नावावर कनेक्शन होते, त्याचे डेथ सर्टिफिकेट द्यावे. नवीन धारकाचा आयडी प्रूफ आणि अॅड्रेस प्रूफ, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र आदी द्यावे.
4.सगळी कागदपत्रे जमा झाल्यावर, एजन्सी त्यांची पडताळणी करेल. त्यानंतर तुमचे ईकेवायसी पूर्ण होऊन काही दिवसांतच कनेक्शन नव्या नावावर ट्रान्सफर करेल.
5.गॅस कनेक्शन ट्रान्सफर करण्यापूर्वी तुमच्या एजन्सीशी बोलून खात्री करून घ्या की, या प्रक्रियेत शुल्क भरावे लागणार आहे की नाही. त्याप्रमाणे कार्यवाही करा.

























































