
भारतीय रेल्वेने आपले जुने अॅप यूटीसी 1 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपच्या जागी आता रेल्वेने नवीन अॅप रेलवन पूर्णपणे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट किंवा मंथली पास बुक करण्यासाठी प्रवाशांकडून यूटीएस अॅपचा वापर केला जात होता. परंतु 1 मार्च 2026 पासून हे अॅप पूर्णपणे बंद केले जाणार आहे. जनरल तिकीट, रिझर्व्हेशन आणि प्लॅटफॉर्म तिकीट आता एकाच अॅपवर बुक करता येऊ शकेल.


























































