
1 रेशनकार्ड अपडेट करण्यासाठी शासनाच्या MahaFood पोर्टल किंवा ‘Mera Ration’ अॅपचा वापर करा. नाव बदलणे, नवीन सदस्य जोडण्यासाठी ई-केवायसी करा.
2 यासाठी आधारकार्ड, मोबाईल नंबर आणि जुने रेशनकार्ड आवश्यक आहे. तुम्ही महा-ई-सेवा पेंद्राद्वारे किंवा जवळच्या शिधा वाटप कार्यालयातही अर्ज करू शकता.
3 महाफूडच्या अधिपृत पोर्टलवर जा. लॉगिन करा. जर नोंदणी नसेल तर नवीन युजर म्हणून नोंदणी करा. अपडेट पर्याय निवडा.
4 रेशनकार्डमध्ये नाव बदलणे, पत्ता बदलणे किंवा नवीन सदस्य जोडणे यापैकी योग्य पर्याय निवडा. माहिती योग्यरीत्या भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5 अर्जाची फी भरून फॉर्म सबमिट करा. रास्त भाव दुकानात जाऊन ई-पीओएस मशीनद्वारे बायोमेट्रिक देऊन तुम्ही
ई-केवायसी पूर्ण करू शकता.



























































