एचपी सहा हजार कर्मचाऱ्यांना काढणार

गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील मोठ्या टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय) मुळे या नोकऱया कपात केल्या जात आहेत. या यादीत आता एचपीचे नाव आले आहे. जगातील प्रमुख काॅम्युटर निर्माता कंपनी असलेली एचपीने नोकरकपातीची घोषणा केली आहे. एआय सेंटिक मॉडल बदलण्यासाठी येत्या दोन वर्षांत एचपी कंपनी सहा हजारांपर्यंत कर्मचारी कपात करणार आहे. एआय सिस्टममुळे केवळ उत्पादन वाढणार नाही, तर विकास, कस्टमर सर्व्हिस आणि निर्णय प्रक्रिया आणखी गतिमान होईल, असे कंपनीला वाटते. एचपीचे सीईओ एनरिक लोरस यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बदलामुळे कंपनी पुढील तीन वर्षांत जवळपास एक अब्ज डॉलरची बचत करेल. एचपी पहिल्यांदा नोकरकपात करणार नाही. याआधी या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एचपीने एक हजार ते दोन हजार कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकले होते. आता कंपनी आपली री-स्ट्रक्चरिंग ड्राइव्हला पुढे नेण्यासाठी सहा हजार कर्मचारी कपात करणार आहे. सर्वात जास्त फटका प्रोडक्ट डेव्हलपमेंट, बँकअँड ऑपरेशन्स आणि कस्टमर सपोर्टवर पडणार आहे.