मामी- भाचीचे सुत जुळले; मंदिरात जाऊन उरकलं लग्न, व्हिडीओ व्हायरल

बिहारमधून प्रेमाचं एक अजबच प्रकरण समोर आले आहे. एका मामीने आपल्या भाचीसोबतच सुत जुळवले आहेत. एकढच काय कर भाचीवरच्या अफाट प्रेमामुळे तिने आपल्या नवऱ्यालाही सोडले आहे. त्यामुळे मामी भाचीच्या या लग्नाची सध्या देशभराच चर्चा सुरू आहे.

बिहारमधील गोपालगंजमध्ये राहणारे हे जोडपे आहे. मामीचे आपल्या भाचीवर प्रेम जडले. सुमन असे मामीचे नाव असून शोभा असे भाचीचे नाव आहे. या दोघींचे प्रेम दोन चार महिन्यांच नसून तब्बल तीन वर्षांपासून आहे. मात्र त्यांच्या या प्रेमाला नातेवाईकांचा नकार होता. तरीही या दोघींनी आपल्या नातेवाइकांचे न ऐकता दुर्गा भवानी मंदिरात लग्न केले. आधी एकमेकांना हार घातले मग मंगळसूत्र घातले अन् सिंदूरही लावले. नंतर एकमेकींच्या सोबतीने सात फेरे देखील घेतले. दरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो आणि काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मामी- भाचीच्या लग्नाच्या व्हायरल व्हिडीओनंतर मामी सुमनने पहिल्यांदा प्रतिक्रिया देखील दिली. शोभा खूप सुंदर आहे. तिचे दुसरीकडे लग्न झाले तर ती मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही लग्न करायचे ठरवले. मग मंदिरात येऊन लग्न केले. असे सुमन म्हणाली. दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली. मात्र या व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.