
मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमानंतर सोशल मीडियावरून होत असलेल्या टीकेमुळे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज व्यथित आणि भावनिक झाले आहेत. ‘आता मी थांबतो… बास झाली 31 वर्षं…’ असे म्हणत कीर्तन सोडण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘लग्न समारंभ साधेपणाने करा, उधळपट्टी टाळा’ असे प्रबोधन आपल्या कीर्तनातून करणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीचा साखरपुडा थाटात केल्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे. यामुळे आपण व्यथित झालो असल्याचे सांगत इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस मी घरी नसायचो. पण आता लोक इतके खाली गेलेत की, माझ्या मुलीच्या कपडय़ांवरही कमेंट्स करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून याच विषयावर बातम्या तयार होत आहेत. माझ्यावर टीका करा, पण माझ्या मुला-मुलींचा काय दोष? या पॅमेरावाल्यांनी आठ दिवसांत माझं जगणं मुश्कील केलं आहे. तुम्हालाही मुलगी आहे. तिच्या कपडय़ांवर पुणी कमेंट केली तर काय वाटेल? साखरपुडय़ात कपडे नवरदेवाकडचे घेतले की मुलीकडचे घेतले, यावरूनही चर्चा करायची का? अशा क्लिप्स टाकणाऱ्यांना लाज पाहिजे,’ असा संताप इंदुरीकर महाराज यांनी व्यक्त केला आहे.
इंदुरीकर महाराज म्हणाले, मी लोकांच्या शिव्या खाऊन, चांगलं कीर्तन करून 31 वर्षं जगलो. पण आता माझ्या घरादारापर्यंत पोहोचल्यामुळे यात मजा राहिलेली नाही. मी अजून उत्तर द्यायला समर्थ आहे; पण कुटुंबावर टीका करणं असंवेदनशील आहे. त्यामुळे मी आता दोन-तीन दिवसांत एक क्लिप टाकणार असून, कीर्तन सोडण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मी लोकांच्या शिव्या
खाऊन, चांगलं कीर्तन करून 31 वर्षं जगलो. पण आता माझ्या घरादारापर्यंत पोहोचल्यामुळे यात मजा राहिलेली नाही.
























































