ICC T20 WC 2026 – नवख्या इटलीसमोर स्कॉटलंडचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टी-20 विश्वचषकात प्रथमच उतरणाऱया इटलीकडे सर्वांचे लक्ष लागलेय. युरोपमधून आलेल्या या देशात स्पर्धेचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. नवखेपणाचा थरार आणि संतुलित संघरचना यामुळे इटलीकडे अनेकांच्या नजरा आहेत.

त्यांची गाठ पडणार आहे ती  स्कॉटलंडशी. वेस्ट इंडिजविरुद्ध पराभव झाला असला तरी त्यांनी लढत दिली. इटलीविरुद्ध ते किंचित फेव्हरेट असतील, पण इतिहास घडवण्याच्या इटलीच्या इराद्यापुढे हे आव्हान सोपं नसेल.

संभाव्य अंतिम संघ

इटली – अँथनी मोस्का, जस्टिन मोस्का, जेजे स्मट्स, वेन मॅडसेन (कर्णधार), हॅरी मानेन्टी, बेन मानेन्टी, जियान-पिएरो मीडे (यष्टिरक्षक), मार्कस कॅम्पोपियानो, जसप्रीत सिंग, क्रिशन कलुगामागे, अली हसन.

स्कॉटलंड – जॉर्ज मन्सी, मायकेल जोन्स, ब्रँडन मॅकमलन, रिची बेरिंग्टन (कर्णधार), टॉम ब्रुस, मॅथ्यू क्रॉस (यष्टिरक्षक), मार्प वॉट, मायकेल लीस्क, ऑलिव्हर डेव्हिडसन, सफ्यान शरीफ, ब्रॅड करा.