ICC Test Rankings – कसोटी क्रमवारीत शुभमन गिलची झेप!

इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅममधील  दुसऱया कसोटीत जबरदस्त कामगिरीच्या जोरावर ‘टीम इंडिया’चा कर्णधार शुभमन गिलने कसोटी क्रिकेटच्या फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. त्याने 15 स्थानाने प्रगती करत कारकीर्दीतील सर्वोत्तम सहाव्या स्थानावर उडी घेतलीय. इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुकने आपला संघसहकारी जो रूटला मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीनुसार एजबॅस्टनमध्ये पहिल्या डावात 158 धावा करणाऱ्या ब्रुकने जो रूटला मागे टापून पहिलं स्थान मिळवलं असून तो आता रूटपेक्षा 18 गुणांनी पुढे आहे. जो रूट आता दुसऱ्या स्थानी घसरला आहे. दुसऱया कसोटीत 269 व 161 धावांच्या ऐतिहासिक खेळी करणाऱया शुभमन गिलने 15 स्थानांची झेप घेत सहावं स्थान गाठलं आहे. ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम 807 गुणांची रेटिंग कामगिरी ठरली आहे.

याशिवाय केन विल्यमसन, यशस्वी जैसवाल आणि स्टीव्ह स्मिथ हे कसोटी फलंदाजी क्रमवारीत अनुक्रमे 3 ते 5 क्रमांकावर आहेत. कारकीर्दीतील सर्वोत्तम 184 नाबाद धावांची खेळी करणाऱ्या इंग्लंडच्या यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोला 16 स्थानांचा फायदा झाला असून तो आता दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

मुल्डर घाबरला आणि मोठी चूक केली! वैयक्तिक 367 धावांवर डाव घोषित केल्याबद्दल ख्रिस गेल नाराज

झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱया कसोटीत नाबाद 367 धावांची विक्रमी खेळी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू विआन मोल्डरला फलंदाजी आणि अष्टपैलू दोन्ही क्रमवारीमध्ये फायदा झाला आहे. तो फलंदाजांच्या यादीत 34 स्थानांनी वर जाऊन 22 व्या स्थानी पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीतही तो 12 स्थानांनी वर जाऊन तिसऱया क्रमांकावर पोहोचला आहे.

IND vs ENG Lords Test – शुभमन गिल सर डॉन ब्रॅडमनना मागे टाकणार?