ICC Women’s T20 World Cup – आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. आता नववा हंगाम बांगलादेशऐवजी यूएईमध्ये खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा बांगलादेशात होणार होती. मात्र, तेथील सत्ताबदल आणि हिंसाचाराच्या घटनांमुळे ही स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता 3 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा युएईमध्ये होणार आहे.
The ninth edition of ICC Women’s #T20WorldCup to be held in October 2024 has been relocated to a new venue.
Details 👇https://t.co/20vK9EMEdN
— ICC (@ICC) August 20, 2024
बांगलादेशातील सद्य परिस्थितीमुळे महिला टी-20 विश्वचषकाची स्पर्धा युएईमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयसीसीने म्हटले आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या स्पर्धेसाठी चांगले नियोजन केले होते. मात्र, तेथील परिस्थितीमुळे ही स्पर्धा युएईमध्ये इतरत्र हलवावी लागली. अनेक सहभागी संघांच्या सरकारने बांगलादेशात स्पर्धा खेळण्यास नकार दर्शवला. त्यामुळे हे बदल करावे लागल्याने आयसीसीने म्हटले आहे.