असं झालं तर… गॅस सिलिंडरमधून गळती झाली तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 गॅस सिलिंडरच्या गळतीनंतर झालेल्या अपघातांमध्ये मोठी हानी होते. सिलिंडरला गळती झाल्यास काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

2 गॅसचा वास येत असल्यास घाबरून न जाता सिलिंडरला लावलेले रेग्युलेटर तत्काळ बंद करा. घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडून मोकळी हवा घरात येऊ द्या.

3 गॅस गळती होत असल्याचा संशय आला तरी सर्व इलेक्ट्रिक स्विच, उपकरणे बंद करावी. माचिस किंवा लायटर वापरू नये. यामुळे आग लागून सिलिंडर स्पह्टाचा धोका वाढतो.

4 गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या एजंसीला कळवून तंत्रज्ञाला पाठवण्यास सांगा. तंत्रज्ञ सिलिंडर व गॅस पाईप तपासून ते बदलून देतात.

5 गॅस गळती टाळण्यासाठी जुने पाईप वापरू नका, गॅस सिलिंडर घेताना त्याच वेळी कंपनीच्या कर्मचाऱयाकडून गळती तपासून घ्या.