
आयआयटी गुवाहाटीच्या बीटेकच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी सुकन्या सोनोवाल हिला कॉमनवेल्थ युथ पीस अॅम्बेसेडर नेटवर्कच्या कार्यकारी समितीचे सदस्य बनवण्यात आले आहे. ही विद्यार्थिनी 2025 ते 2027 या कालावधीसाठी कम्युनिकेशन आणि जनसंपर्क प्रमुख म्हणून काम करणार आहे. 56 राष्ट्रपुल देशांमधील तरुणांमधून सुकन्याची निवड करण्यात आली आहे. यासाठी सुकन्याला तीन टप्प्यांच्या निवड प्रक्रियेतून जावे लागले. या प्रक्रियेत उमेदवारांची शांततेसाठी वचनबद्धता, राष्ट्रकुल मूल्यांचे ज्ञान आणि नेतृत्व अनुभवाची चाचणी घेतली जाते. आयआयटी गुवाहाटीमध्ये शिकत असताना सुकन्याने अनेक आउटरीच कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.