
लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील हडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांनी खांद्यावर जू घेऊन आंतर मशागत करतानाचे वृत दैनिक सामनाने 30 जून रोजी प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची होत असलेली परवड जगासमोर आली होती. हा मुद्दा राज्याच्या अधिवेशनातही गाजला. या शेतकऱ्यांची हतबलता जगासमोर आल्यानंतर आता या शेतकऱ्यांसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत.
शेतकऱ्याची होणारी परवड पाहून महाराष्ट्र व परराज्यातून शेतकरी अंबादास पवार यांना मदत मिळू लागली आहे. गेल्या आठवड्याभरापासून बऱ्याच जणांनी पवार यांना मदतीचा हात दिला आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी 41 हजार 500 रुपये थकीत कर्ज भरून बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले. हैदराबाद येथील राघू आरीक पुडी सेवा ट्रस्ट ने 1,00,000 रुपयांचा धनादेश दिला आहे. क्रांतीकारी संघटनेच्या वतीने बैल जोडी , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून 40,000 रुपये रोख मदत मिळाली आहे. रविंद्र शंकर देवरे नाशिक 50000 रुपये मिळाले आहेत. नाम फांऊडेंशन विलास चामे यांच्याकडून 21000 रूपये , स्वाभिमानी शेतकरी संघटना नितीन देसाई यांच्याकडून 10000 रूपये , मुंबई कर्नल विलास डांगे यांच्याकडून 1000 रूपये , आजित पवार गटाकडून 40000 रूपये , शासकीय कर्मचारी विजयवाडा 5000 रुपये, आदिलाबाद येथील एका शेतकऱ्याने 2000 रुपयांची मदत केली आहे. अशी एकूण रोख 3,70,000 रुपयांसह बैलजोडी आणि अन्नधान्याची मदत पवार यांना मिळाली आहे. याचे सर्व श्रेय शेतकरी अंबादास पवार यांनी दै. सामनाला दिले आहे.