
मुंबई सारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही. 27 महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई बुडाली असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कारभारामुळे मुंबईत हाहाःकार उडाला अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल आमची योगायोगान जी गहमंत्र्यांसोबत बैठक होती कन्सल्टेटिव्ह कमिटीची. त्याचा विषय होता डिझास्टर मॅनेजमेंट. देशभरामध्ये जे पूर येतायत, भूस्खलन होतं, ढगफुटी होते. या संदर्भात सरकारची तयारी काय आहे हे काल आम्ही चर्चेला होतो. गृहमंत्री स्वतः होते त्यांचे गृहसचिव होते इतर सगळ्या त्यांच्या संस्था मी हा प्रश्न उपस्थित केला की आपण मुंबई सारखं शहर पाण्यात गेलेल आहे, मराठवाड्यामध्ये लष्कर बोलवावा लागलं, किस्तवाडामध्ये 65 लोक भूस्खलनामध्ये मरण पावले, उत्तराखंड मधल्या धरोलीमध्ये सुद्धा शंभराच्या आसपास लोक मरण पावलेली आहेत. हे प्रत्येक ठिकाणी होत आहे. तुमची जी यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते, अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय? मुंबई सारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही. 27 महानगरपालिकामध्ये भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबई बुडाली, पुणे बुडालं, नागपूर बुडतंय, नांदेड बुडालं, मराठवाडा बुडाला, याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार सरकारची धोरणं. आतापर्यंत काही झालं की आमच्यावर खापर फोडत होते, आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना? प्रशासनाकडे काल मोठे नगर विकास मंत्री छत्री घेऊन फिरत होते, शेंगदाणे खात. आधी का नाही फिरलात ? मोनोरेल बंद पडली, लोकं अडकले. या सगळ्याला जबाबदार महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी केलेल शासन आणि अमित शहांचा या अशा सरकारला असलेला पाठिंबा. त्यामुळे काल मुंबईसह महाराष्ट्रामध्ये हाहाःकार उडाला लोक मरण पावली. त्याचे प्रायश्चित त्यांनी घ्यायला पाहिजे. काल हा विषय मी अमित शहा समोर मांडलेला आहे.त्यांनी एक तक्ता केला होता की काही राज्य असे आहेत जिथे जास्त पाऊस पडतो आणि अनेक राज्यांमध्ये कमी पाऊस पडल्यामुळे अपघात कमी होतात. कमी पावसामध्ये त्यांनी महाराष्ट्र दाखवला. मी म्हटलं उलटं दाखवताय महाराष्ट्रामध्ये देशातला सर्वाधिक पाऊस पडलेला आहे आणि तुमची यंत्रणा त्यात वाहून गेली आहे मिस्टर गृहमंत्रीजी. ते ऐकतात, मान हलवतात आणि म्हणतात करेंगे मुंबई को डुबने नही देंगे वगैरे म्हणतात.
तसेच अजित पवार खूप खूप मोठे तज्ञ आहेत. त्यांना सर्व कळतं. मोनोरेल मध्ये लोक जास्त का घुसली याचं पण त्यांनी कारण द्यावं. मोनोरेल मध्ये जास्त लोक घुसली असतील त्यांना घुसू कसं दिलं? ती नियमित रेल्वे नाहीयs उपनगरी रेल्वे की घुसले लोक, ही वरून चालणारी रेल्वे आहे. हे जर तस असेल ते त्यांच्या सरकारचा अपयश आहे.जर त्यांना त्या मोनोची क्षमता माहित होती याचा अर्थ मोठा अपघात हा सुदेवाने टळला. एकनाथ शिंदे काल ते छत्री घेऊन मुंबईत फिरत होते कॅमेरे घेऊन. काल त्यांच्यावरती इतकी मोठी जबाबदारी होती मुंबई बुडालं ठाण बुडालं कल्याण डोंबोली बुडालं पुणे बुडाल नागपूर बुडालं हे त्यांना सगळं बुडाल्यावर कळालं की आपण ज्या खात्याचे मंत्री आहोत ते पाप असं वरती आलंय बुडबुड बुड बुड. तेव्हा ते बुडणारं पाप बघायला गेले होते. त्याच्यामुळे ते मंत्रिमंडळाला उपस्थित नव्हते असेही संजय राऊत म्हणाले.
काल अख्खी शिवसेना रस्त्यावर होती. ठाकरे म्हणजे शिवसेना. काल माननीय उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सातत्याने अख्ख्या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक मदतीला उतरण्यासाठी यंत्रणा राबवत होते. वरळी हा त्यांचा मतदारसंघ जरूर आहे, पण अख्खी शिवसेनेची यंत्रणा लोकांना रस्त्यावर उतरून मदत करत होती. सगळ्यात आधी जबाबदारी ही नगर विकास मंत्र्याची आहे. या सगळ्या प्रकरणात नगर विकास मंत्रालयाला फासावर लटकवायला पाहिजे.सरकार कोणाचे आहे? सरकार का ठाकरेंचा आहे की शिंदे फडवणीस पवारांचा आहे ना.रस्त्यावर काल शिवसैनिक उतरला होता, दुसरं कोण होतं, हे नुसते छत्र्या घेऊन कॅमेरे घेऊन फिरत होते असेही संजय राऊत यांनी नमूद केले.