
इंग्लंडमध्ये पान खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड वाढली आहे. इंग्लंडचे रस्ते आणि कचराकुंडी हे पान खाऊन थुंकल्याने लाल होत आहेत, असे व्हिडीओ समोर आले आहेत. लंडनच्या रेयर्स लेन ते नॉर्थ हॅरोपर्यंतच्या भागात ही परिस्थिती अधिक आहे. तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्या दुकानांबाहेर आणि भोजनालयाबाहेरसुद्धा हीच परिस्थिती आहे, असा दावा रेयर्स लेन येथील एका रहिवाशाने केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या परिस्थितीसाठी इंग्लंडवासीयांनी हिंदुस्थानी समुदायाला जबाबदार धरले आहे.