
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेला 159 धावांमध्ये ढेर करत टीम इंडियाने घरच्या मैदानावर आम्हीच शेर असल्याचे सिद्ध केले. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटीत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आफ्रिकन फलंदाजांना वेसन घालत विकेटचा पंच ठोकला. मोहम्मद सिराज, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेत त्याला उत्तम साथ दिली.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. एडम मार्करम आणि रायन रिकल्टन यांनी बुमराह-सिराजचा सुरुवातीचा स्पेल खेळून काढत आफ्रिकेला अर्धशतकीय सलामी दिली. मात्र बुमराहने लागोपाठच्या दोन षटकांमध्ये आफ्रिकेच्या दोन्ही ओपनरला माघारी पाठवत आफ्रिकेची अवस्था बिनबाद 57 वरून 2 बाद 62 केली.
त्यानंतर कुलदीप यादवने मुल्डर आणि कर्णधार बावुमा यांना बाद केले. मधल्या फळीत स्टब्सने एक बाजू लावून धरली मात्र इतर फलंदाजांची त्याला साथ मिळाली नाही. स्टब्स 74 चेंडूत 15 धावा काढून नाबाद राहिला. मात्र समोरून एक एक फलंदाज झटपट बाद झाल्याने आफ्रिकेचा डाव 55 षटकात 159 धावांमध्ये आटोपला. आफ्रिकेकडून एडन मार्करमने सर्वाधिक 31 धावा केल्या.
️
A Jasprit Bumrah special in Kolkata
His 1⃣6⃣th five-wicket haul in Tests
Scorecard ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/XKOFIWpUvV
— BCCI (@BCCI) November 14, 2025

























































